समोसा.. पाऊस आणि बरंच काही..

आपल्या सर्वांचा आवडता समोसा मूळचा भारतीय नाही. आश्चर्य वाटलं ना ऐकून ? होय पण हे खरे आहे..  १० व्या शतकात मध्य आशिया आणि पर्शिया (इराण) मध्ये याचा उगम झाला. तेव्हा त्याला 'संबूषक' (Sambusak) म्हटले जायचे. व्यापारी आणि आक्रमकांच्या माध्यमातून १३ व्या-१४ व्या शतकात हा पदार्थ भारतात आला.

समोशाचा रंजक प्रवास ऐकायला आपल्याला नक्की आवडेल.. 

सुरुवातीचा समोसा पर्शियामध्ये समोस्यामध्ये मसालेदार कीमा, मांस आणि सुक्या मेव्याचे सार भरले जात असे.

या सामोशाचे भारतात आगमन : दिल्ली सल्तनतच्या काळात (इ.स. १३०० च्या सुमारास) हा पदार्थ भारतात दाखल झाला. प्रसिद्ध प्रवासी इब्न बतूता आणि कवी अमीर खुसरो यांनी आपल्या लेखनात समोशाचे कौतुक केले आहे.

बटाट्याची एन्ट्री: १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात बटाटा आणला. त्यानंतर भारतीयांनी समोशात मांसाऐवजी बटाट्याचे मसालेदार मिश्रण भरायला सुरुवात केली. हा बदल भारतीयांना इतका आवडला की आज जगभर हाच 'आलू समोसा' प्रसिद्ध आहे.विविध नावे: भारतात समोसा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये याला 'शिंगाडा' (Sighara) म्हणतात. 

आज आपल्याकडे लहान थोरांना आणि घरगुती कार्यक्रम असो अथवा एखादं गेट टुगेदर असो. सामोसा मस्ट झालेला आहे. बाहेर पाऊस पडत असतांना सामोसा आणि चहा हा योग्य म्हणजे राजेशाही थाट आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

127

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.