रविवार २ ऑगस्ट २०२६ रोजी जुनी डोंबिवली पश्चिम नेमाडे गल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार गट ) यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना वह्यावाटपाचा कार्यक्रम केला. डोंबिवली, दिवा परिसरातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी या संधीचा फायदा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग सतत समाजाभिमुख आणि विद्यार्थी व महिला तथा रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी त्याचप्रमाणे स्वयंरोजगार व सरकारी योजना राबवून व आरोग्यशिबिरे या विविधांगी उपक्रमांच्या माध्यमांतून उपक्रम राबवून पंचक्रोशीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नाव उज्वल करीत आहे. अगदी अल्पावधीतच राष्ट्रवादीच्या उद्योग विभागाने त्यांचे नाव केले असल्याने लोक उद्योग विभागाकडे आदराने पाहत आहेत..
वह्या वाटपाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई उद्योग विभागाचे अध्यक्ष अश्विन केळकर, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योगचे मुंबई विभागीय सचिव प्रा. दिपक जाधव, शाम चौगले, व संदीप उबाळे, डॉ. उदयराज तळेकर, संदीप पालव, रवींद्र शिंदे, व्यंकटेश नायडू, सुजित गुप्ता, शैलेश प्रधान, अजय राजापूरकर, हंसू अली, निर्मिती सावरकर, रसाळ साहेब, हिमांशू तिळवे, नित्यानंद पुजारी, जितेंद्र अडसूळ, सुधाकर शिवनेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. राष्ट्रवादी उद्योग विभाग अशा प्रकारे चांगले उपक्रम राबवित असल्याने उपस्थित पालकांनी उद्योग विभाग व पदाधिकारी तथा कार्यकत्यांचे विशेष कौतुक केले..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.