शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र व अवनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीस यांच्या संयुक्त विद्यमाने, जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत अन्न वाटप करण्याचा संकल्प सोडला आहे.
विविध सामाजिक संघटनांबरोबरच रोज कुणी ना कुणी अनामिक अन्नदाता या मुलांना मोफत भोजन देत आहे. यात आपल्या शक्तीनुसार शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तथा अवनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीस यांच्यासोबतच आपल्यासारखे दानशूर मंडळींचे योगदान लाभल्यास खूप बरे होईल असे वाटते.
विद्यार्थ्यांचा संघर्ष हा केवळ त्यांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. या संघर्षाच्या काळात कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये, या सामाजिक जाणीवेतून आम्ही हा सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे.
"भुकेल्याला अन्न, संघर्षाला बळ आणि विद्यार्थ्यांना आधार" या भावनेतून सुरू असलेली ही सेवा निरंतर सुरू राहील.
या सेवाभावी कार्यात आपणही सहभागी होऊ शकता.
विद्यार्थ्यांसाठी अन्नदान किंवा आर्थिक स्वरूपात आपले स्वेच्छेने योगदान द्यायचे असल्यास कृपया 9420736424 या क्रमांकावर संपर्क साधा.
आपले छोटेसे योगदान एखाद्या विद्यार्थ्याला मोठा आधार ठरू शकते.
– शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
– अवनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीस..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.