आयुष्यात कधी कुणी कुणाला सहज भेटत नाही..

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

अगदी खरं आहे कधीकधी काही मंडळी आयुष्यातून कायमची निघून गेलेली असतात. मात्र, अशी मंडळी खूप वर्षांनी अचानक आपल्या समोर येतात आणि पुन्हा आपली नाळ अशा व्यक्तींशी जुळते.. पूर्वजन्म आणि स्वर्ग नरक या गोष्टींवर माझा मुळीच विश्वास नाही. पण, जर कदाचित असे असेल तर पूर्वजन्मीचे राहून गेलेले भोगायला अथवा फेडायला अशा मंडळींना पुन्हा जन्म घ्यावा लागतो.. जर अचानक अशी इतिहासात जमा झालेली माणसे किंवा आपल्यापासून दुरावलेली माणसे पुन्हा आपल्या आयुष्यात आली तर ती माणसे आपले आयुष्य उजळवायला आलेली आहेत एवढे मात्र निश्चित असते.. अशा पुन्हा आपल्याशी नाळ जुळलेल्या माणसांना जपून ठेवायचे असते कारण ही माणसे आपल्या जगण्यातले काहीतरी सुटून गेलेले, राहून गेलेले पूर्ण करण्यास आलेली असतात. कुणीच कुणाला बिनामतलब भेटत नसल्याने जे आपल्या जवळ आले आहेत त्यांना जपून ठेवा आणि आपल्या अर्ध्या आयुष्याला पूर्ण करा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

88

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.