जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..
थोडक्यात काय तर आपण स्वतःचं झाकून ठेवतो. हल्ली लोकांना शहाणं करण्याच्या भानगडीत कुणीच पडू नये. आपण ज्यांना शहाणं करायला जातो ते सर्व आपल्यापेक्षा हुशार आहेत हे आपल्या लक्षातच येत नाही. मुळात जे आपला गैरफायदा घेत असतात आणि जे आपल्या जीवावर फुकट खातात अथवा गाजतात त्यांना तुम्ही करून देत असलेल्या त्यांच्या कामाचा मोबदला जर तुमच्या मेहनतीला मिळत नसेल तर ते कामच आपण करायचेच नाही. थोडक्यात हल्ली फुकटात कुणीच काहीच मागू नये आणि कुणी ते देऊ सुद्धा नये. मुळात लोकांकडून फुकटची अपेक्षाच करू नये. तुम्हाला गाजायचं आहे ना मग तुम्ही पैसे मोजा ना.. तात्पर्य काय तर लोकांना ओळखण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा अगोदर आपण स्वतःला ओळखा आणि फुकटची समाजसेवा बंद करा.. असे मी हल्ली स्वतःच स्वतःला बजावतो आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.