कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..
रस्ता तिथेच असतो, रस्ता कधीच धावत पळत नाही.. पळत असतो आपण अगदी अविश्रांत.. जीवाच्या आकांताने.. स्वप्नांचा आणि भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी.. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि अंतरात अनेक प्रश्न घेऊन खोट्या चेहऱ्याने वावरणारे आपण सर्व.. या दृश्याला आपल्या मोबाईल मध्ये टिपले आहे डोंबिवली पश्चिम ब्रिज वरून आपल्या शब्द खड्गचे व्यवस्थापक आणि विशेष प्रतिनिधी श्री. शिवाजी जाधव यांनी.. कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून.. यालाच तर जगणे म्हणतात.. बरोबर ना..
- शिवाजी जाधव. व्यवस्थापक / विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.