डोंबिवलीचे रस्ते मोकळा श्वास घेणार कधी..??

सकाळ असो अथवा रात्र असो डोंबिवलीच्या रस्त्यांवर आणि फुटपाथ वर सतत गर्दीचे साम्राज्य असल्याने डोंबिवलीकर भलतेच हैराण झाले आहेत. शब्द खड्गने या संदर्भात अनेक सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला असता लोक म्हटले की, जेव्हा डोंबिवलीच्या ईस्ट-वेस्ट ब्रिजवर ट्रॅफिक होतं किंवा माणकोली ब्रिजकडे जायला जो रस्ता आहे  व पुढे गेल्यावर फाटक लागते. खूपदा हे फाटक रेल्वे येत जात असल्याने बंद असते आणि मग गाड्यांच्या रांगा लागतात.. डोंबिवली पश्चिमेला साऊथ इंडियन स्कुल जवळ जो उताराचा ब्रिज आहे तिथून खाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या  शास्त्रीनगर रुग्णालया कडे आणि त्याच्या थोडे समोरच असलेल्या गार्गी वृद्धाश्रम आणि व्हीनस हॉस्पिटलकडे येणाऱ्या जाणाऱ्या कार्डिऍक ॲम्बुलन्स ला सुद्धा या ट्रॅफिकचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.. खूप वेळ अत्यवस्थ पेशंट्सला घेऊन थांबावे लागते आणि म्हणून संबंधितांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी येथील स्थानिक लोकांची मागणी आहे.. 

- द्वीप संतोष पूर्वा चेऊलकर. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

48

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.