डोंबिवलीत रिक्षाभाडे 15 रुपयांवरून 20 रुपये केल्याने प्रवासी नाराज. पुणे सोलापुरात भाडे वाढल्याची रिक्षा युनियनची माहिती..

अधिकृतरीत्या असे कुठलेही परिपत्रक प्राप्त न झाल्याची वाहतूक विभागाची माहिती..

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, घरगुती सिलेंडर गॅस आणि इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असतांना मुंबई परिवहन प्राधिकरणाने 1 सप्टेंबर पासून दोन वर्षांत 26 रुपयांवरून फक्त 1 रुपया रिक्षा भाडेवाढ करून 27 रुपये केले असल्याची माहिती डोंबिवलीतील रिक्षा युनियन कार्यकर्त्यांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राला दिली. 

रिक्षा युनियनच्या म्हणण्यानुसार पुणे व सोलापूर परिवहन प्राधिकरणाने पूर्वीचे 23 रुपयांचे भाडे 30 रुपये केले आहे. सरकार अशाप्रकारे रिक्षावाल्यांच्या बाबतीत भेदभाव का करीत आहे असा प्रश्न सर्वसामान्य रिक्षावाले व त्यांच्या युनियन संबंधितांना विचारीत आहेत. डोंबिवली पश्चिमेत तृप्ती हॉटेल समोरील रिक्षा स्टॅन्ड जवळ लालबावटा रिक्षा युनियनने तसा बोर्ड लावला आहे. 

काही रिक्षावाले आज सकाळपासून 15 ऐवजी 20 रुपये रिक्षाभाडे आकारीत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ व नाराजीची भावना निर्माण झाली आहे. डोंबिवली वाहतूक नियमन विभागाचे सिनिअर पोलीस अधिकारी विजय अहिरे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता रिक्षा भाडे वाढल्याचे कुठलेही परिपत्रक अद्याप आपल्याला प्राप्त झाले नाही असे त्यांनी सांगितले. या संदर्भात शब्द खड्ग ने कल्याण डेपोटी आरटीओ आशुतोष बुरकूल साहेबांना संपर्क साधला असता ते फोनवर उपलब्ध होऊ शकले नाही.

डोंबिवलीतील सहा रिक्षा युनियनने एकत्र बसून भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचे रिक्षा युनियनचे कार्यकर्ते सांगत असले तरी याची माहिती रिक्षा प्रवाशांना नाही व 5 रुपये वाढवून द्या व आम्हाला सहकार्य करा असे रिक्षावाले बोलत असले तरी प्रवाशी मात्र खूप नाराज आहेत. काही रिक्षावाल्यांनी अशी मागणी केली की भाडे 15 रुपयेच राहू द्या ते वाढवू नका मात्र पुढच्या सीटवर आम्हाला एक भाडे घेऊ द्या.. म्हणजे टोटल 4 सीट बसविण्याची परवानगी द्या. मात्र, नियमानुसार असे होऊ शकत नाही हे रिक्षावाल्यांना सुद्धा ठाऊक आहे. डोंबिवलीतील  या रिक्षाभाडेवाढी संदर्भात आरटीओ विभागाने योग्य तो खुलासा करावा अशी मागणी रिक्षा प्रवासी करीत आहेत.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

53

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.