व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सदस्य जोडताना १,०२४ ची मर्यादा संपली की नवीन ग्रुप तयार करण्याशिवाय पर्याय राहत नव्हता. मात्र, आता ही कटकट कमी होणार आहे. व्हॉट्सॲपने ग्रुपमधील सदस्यांची कमाल मर्यादा थेट १,५०० पर्यंत वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकाच ग्रुपमध्ये आता तब्बल १,५०० जणांना सहभागी करता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी ॲडमिनला कोणत्याही सेटिंगमध्ये बदल करावा लागणार नाही. अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना हे अपडेट टप्प्याटप्प्याने मिळणार आहे..
अँड्रॉइड आणि आयफोनवर मिळणार सुविधा
व्हॉट्सॲपमधील नव्या बदलांची माहिती देणाऱ्या 'वाबेटाइन्फो' या संकेतस्थळाने सर्वप्रथम याबाबत वृत्त दिले. त्यानुसार, ग्रुपमधील सदस्यांची मर्यादा वाढवण्याची सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस ( iOS) या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारचे स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सना आता म…
ग्रुप ॲडमिनला कोणतेही सेटिंग बदलावे लागणार नाही
नव्या अपडेटमधील महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रुपची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी ॲडमिनला कोणतीही विशेष प्रक्रिया करावी लागणार नाही. व्हॉट्सॲपकडून ही सुविधा आधीपासून अस्तित्वात असलेल्या ग्रुपमध्येही आपोआप लागू केली जात आहे.
व्हॉट्सॲप कम्युनिटीमधील ग्रुपनाही फायदा
सदस्यसंख्येची वाढीव मर्यादा केवळ सामान्य ग्रुपपुरती मर्यादित नसणार आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटीजमधील स्वतंत्र ग्रुप चॅटसाठीही ही सुविधा लागू होणार आहे. त्यामुळे कम्युनिटी ॲडमिनना त्यांच्या ग्रुपमध्ये अधिक सदस्यांना सहभागी करून घेता येईल.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.