हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..
आणि आपण फुकटात जरी सर्व दिलं ते घ्यायला सुद्धा मानसिकता लागते.. आपण मेहनत केल्यावर जे यश आपल्याला मिळतं अथवा पहिला पगार.. तव्यावर बनविलेली पहिली भाकरी.. मग ती भाकरी करपलेली का असेना तो आनंद अवर्णनीय असतो. माझ्या आयुष्यात अनेक स्त्री पुरुष आणि महिला मुले आलीत आणि यापुढे सुद्धा येतील. पण, यातील खूप मोठ्या प्रमाणातील मंडळी फक्त गरजकाढू असल्याचे त्यांनी मला दाखवून दिले आहे. काही मंडळी खूप रागाची होती.. स्वतः चूक करणार आणि खापर आपल्या माथ्यावर फोडणार. काही मंडळी हा एकटा मरतोय ना मरूदे या प्रवृत्तीची आहेत. या नादान लोकांना एवढे कळत नाही की मार्केट मध्ये उतरल्यावर आपण जी संधी देतो ती संधी कुणालाच अल्प स्वल्प दरात आणि सहज सहजी मिळत नाही. मी हे जनरल बोलतोय बरे. कारण मी विविध क्षेत्रांत वावरलो आहे आणि वावरत आहे. संधीचं सोनं करायला सुद्धा स्वतःत गट्स लागतात..
खूपशा मंडळींना आपण त्यांच्यासाठी फुकटात मरतोय याची जाणिव नसते. मी स्वतः अनेक क्षेत्रांत काम करीत असल्याने चांगली वाईट, दिलदार आणि गरजकाढू माणसे मला लगेच कळतात, रोज भेटतात.. आपल्या दारी आलेली फुकटातली संधी घ्यायला सुद्धा बुद्धी आणि नशीब लागते. मी कॉलेजचा विद्यार्थी असतांना माझे एक प्राध्यापक होते. हे प्राध्यापक महोदय सल्ला आणि त्यांची ओळख वापरून संधी देण्याची फी आकारायचे. मला तेव्हा त्यांचा खूप राग यायचा. एकदा मी त्यांना विचारले सर इतक्या साध्याशा सल्ला आणि तुमची ओळख वापरून दिलेल्या संधीचे पैसे का घेता, तेव्हा सर म्हटले अरे मी पूर्वी स्वखर्चाने हे सर्व उद्योग करीत होतो. पण, लोक मला गृहीत धरू लागले. आता मी फी आकारतोय तर माझी किंमत वाढली आहे आणि मला लोक गांभीर्याने घेत आहेत. सुज्ञ लोकांना मला काय म्हणायचे आहे ते कळले असेलच. आपण समोरच्याला पुढे काढण्यासाठी जीवाचे रान करतो. मात्र, तो समोरचा हे गमतीने घेतो. नुकसान माझे नाही त्या समोरच्याचे आहे. कारण झोळी समोरच्याची फाटकी आहे माझी नाही..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.