सविस्तर वृत्त असे की.. शनिवार दिनांक 08/08/2026 रोजी डोंबिवली वाहतूक उपविभाग व RTO कल्याण यांच्या मार्फतीने संयुक्त कारवाई डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात करण्यात आली सदर कारवाई ब्लॅक फिल्म , नो एंट्री, HSP नंबर प्लेट न लावलेली वाहने, कसूरदार रिक्षा चालक अशाप्रकारे दुचाकी, तीन चाकी, व चार चाकी अशा एकूण 36 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कविता पवार, भावना पाटील असे अधिकारी व स्टाफ यांनी सदरची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अशाप्रकारे दररोज वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सर्व वाहनांवर सक्त कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून प्राप्त झालेली आहे.
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.