पुढच्यास ठेच मागचा शहाणा..

मनातलं पान..

हल्ली मी माझे अनुभव शेअर करीत आहे कारण माझ्या अनुभवातून दोन चार जरी शहाणे झाले तरी माझ्या लिहिण्याचा फायदा होईल असे मी समजतो.. जे माझे होऊ शकले नाही ते तुमचे काय होणार ? असे शब्द खूपदा आपल्या कानावर येतात. हे अगदी खरं आहे मी अनेकांना माझ्या कुवतीनुसार लिहितं, बोलतं आणि स्टेजवर उभं केलं आणि अजूनही करतो आहे. मात्र, यातील खूप सारे गद्दार निघाले त्यांना उपकाराची जाण राहिली नाही. आणि काही मंडळी तर गरज सरल्यावर मला बायपास करून माझ्याच ग्रुपच्या लोकांशी जवळीक साधू लागली. जे माझे खूप जवळचे मित्र आहेत ते लगेच मला या बाबतीत माहिती देतात. खरेतर हे मला बायपास करणारे अजूनही माझ्याशी खोटं बोलून माझीच मदत घेत आहेत. कधीकधी मला या गोष्टीची खूपच गंमत वाटते. लोक इतकेही खालच्या पातळीला आणि थराला जाऊ शकतात हे पाहून त्यांची किंवा करावीशी वाटते. ज्याने आपल्याला  आपल्या पडत्या काळात हात आणि समर्थ साथ दिली आहे अशा माणसांना कधीच दगा द्यायचा नसतो. पण, ज्यांच्या रक्तातच प्रामाणिकपणा नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. तुमच्याही आयुष्यात असे स्त्री पुरुष आले असतीलच ना. आणि म्हणून मी वारंवार म्हणतो की, ज्यांना मी घडवलं ते माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाचे झाले नाहीत तर तुमचे काय होणार ?? अशा दिलफेक लोकांपासून नेहमीच सावध रहा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

162

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.