शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या घडत असलेल्या एकूण प्रकारणांवरून वारंवार दिसत आहे..
कायद्याने बुवाबाजीला बंदी असली तरी ती प्रत्यक्षात मात्र केव्हाच उतरविली जात नाही. रोज नवनवे बाबा बुवा आणि आया बाया जन्मास येत आहेत. त्यांचे मठ, आखाडे आणि संस्थाने उभी राहत आहेत. खरेतर अशा सर्व आखाड्यांना आणि बाबा बुवांना सरकार लावीत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी चाप लावण्याची वेळ आलेली आहे. प्रगतीकडे निघण्या ऐवजी आपण अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बुवाबाजीकडे निघालेलो आहोत. काळीजादु .. अंधश्रद्धा .. बुवाबाजी ..आपल्याला खात आहे आणि आपले तथा देशाचे वाटोळे करीत आहे असे आपल्याला वाटते काय ?? शब्द खड्गच्या मंचावर आपली मते रोखठोक मांडा आम्ही इथे मांडल्या गेलेल्या मतांना प्रसिद्धी देऊ..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.