पत्रकारिता क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि सांस्कृतिक क्षेत्रांत वावरताना मला नेहमी खूप वेगवेगळे अनुभव येत आहेत. अर्थात असे अनुभव या क्षेत्रांत वावरणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी आलेलेच असतात. नव्वद टक्के लोकांना त्यांच्या बातम्या फुकट लिहून हव्या असतात. किंवा शॉर्टफिल्म मध्ये फुकटात काम करायचे असते.. तर दहा टक्के लोक सर किती पैसे पडतील हे विचारतात. कारण त्यांना ठाऊक असते की वृत्तपत्र हा व्यवसाय आहे आणि शॉर्टफिल्म साठी सुद्धा पैसे लागतात..
आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राची एक खासियत आहे आपण समाजाभिमुख बातम्यांचे आणि गोरगरिबांच्या बातम्यांचे कधीच पैसे घेत नाही आणि घेणार सुद्धा नाही. मात्र, काही लोक याचाच गैर फायदा घेतात.
आता हौस म्हणून नवोदित कलाकार आणि अक्षरश: धुणी भांडी करणाऱ्या माता भगिनींना सुद्धा आपण आपल्या शॉर्टफिल्म, गाण्याची स्पर्धा इत्यादी विविध ठिकाणी संधी उपलब्ध करून देत आहोत. मी लेखक - दिग्दर्शक आहे, संपादक आहे. मात्र, मी निर्माता नाही.. मी माझ्यापरीने प्रत्येकाला गाजविण्याचा प्रयत्न करतो आणि कायमच करेल. परंतु तुम्हाला मी तुमच्या अंगातील कला बाहेर काढायला आणि तिला मंच मिळवून द्यायला पुढाकार घेणार आणि तुम्ही मात्र कुठलेही काँट्रीब्युशन न देता लेखक - दिग्दर्शकाने आणि संपादकानेच हे त्याच्या पदर खर्चाने करावे अशी अपेक्षा ठेवीत असाल तर ते सर्वस्वी चूक आहे.
हौस तुमची, गाजणार तुम्ही मग त्यासाठी लागणारी अल्प स्वल्प रक्कम द्यायला तुम्हाला त्रास का होतो आहे.. ? वाण्याच्या दुकानात गेलात तर कुणी तुम्हाला काही फुकटात देते का हो ? विचारा स्वतःच्या मनाला.. आणि म्हणूनच जर कुठला प्रोजेक्ट करायचा असेल आणि कुणाला त्यात काम करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आर्थिक काँट्रीब्युशन करावेच लागेल. आणि म्हणूनच आपल्याला सर्व फुकटात मिळेल ही अपेक्षा कधीच ठेऊ नका.. मी कुणालाच फुकट संधी देणार नाही याची नोंद घ्या..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र.. लेखक - दिग्दर्शक..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.