मनातलं पान..
आपल्या पैकी बहुतांश लोकांचं होतं काय की आपल्या अहंकारात आपण समोरची व्यक्ती आपल्याला आपल्या भल्याचे काही सांगत आहे ते ऐकत नाही. खरेतर आपली मानसिक कुवतच नसते.. आपल्याला असे वाटते की मला सर्व काही येते आहे. आणि या गुर्मितच जी व्यक्ती आपल्याला आपल्या विकासाचं सांगायला जाईल त्याला आपण आपले दुश्मन समजू लागतो आणि अशा भल्या व्यक्तीशी संबंध बिघडवून टाकतो.. दुर्दैव हे आहे की आपण सत्य स्वीकारूच शकत नाही. ज्याने आपल्याला संधी दिली आपण त्याच्याच पाठीत खंजीर खुपसू लागतो.. विशेष म्हणजे आपल्याला आपली चूक मान्यच नसते. जी व्यक्ती तुमच्या चुका दाखविते, जी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी तुमच्यावर रागावते ती व्यक्ती तुम्हाला गाजविण्यासाठी अहोरात्र धडपडलेली असते आणि याचीच कुणी जाणीव ठेवत नाही. गोड बोलणारी माणसे कधीच आपली नसतात. तुम्ही जगा नाहीतर मरा त्यांना काही फरक पडत नाही. पण, जे आपले असतात ना तेच तुमच्यावर रागावतात. म्हणून असे हक्काने रागावणारे मित्र मैत्रिणी तुमच्या जवळ असतील तर त्यांना सांभाळून ठेवा कारण अशी माणसं फार दुर्मिळ असतात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.