आयुष्यात एक तरी चांगला छंद जोपासा..

मनातलं पान.. 

आपल्या धकाधकीच्या आयुष्यात शरीराबरोबरच मनाला आनंद देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे छंद. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असू शकतो. मात्र, हा छंद स्वतःच्या मना बरोबरच आपल्या सहवासातील लोकांनाही आनंद आणि मार्गदर्शक ठरत असेल तर खूप छान होते. मित्रांनो छंदातून रोजगार मिळू शकतो. आपल्या अवतीभोवती चांगली माणसे गोळा होतात. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला.. असे कुणाच्याच आयुष्यात होता कामा नये. खरे तर छंद आणि व्यसन या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मात्र, काही माणसांना छंदाचे व्यसन लागते आणि त्यांचे जगणे मग ती गोष्ट केली नाही तर असह्य होते. वाईट व्यसन असण्या पेक्षा आणि याची त्याची उठाठेव करीत बसण्या पेक्षा कधीही चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणे  उत्तम असते. जगा आणि जगू  द्या .. हे तत्व अंमलात आणतांना छंद जोपासल्याने मन, शरीर  ताजे तवाने आणि टवटवीत होऊन आपण पुन्हा नव्याने समोर येणाऱ्या समस्या आणि आयुष्याला भिडू शकतो.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र.

348

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.