परंपरेला तिलांजली देऊन सणांच्या नावाखाली स्टेजवर अश्लील नाचणाऱ्या महिलांना प्राध्यान्य दिलं जातंय का..??

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा सर्वसामान्य जनतेला रोखठोक सवाल.. 

मित्रांनो वरील प्रश्न आम्ही सर्वसामान्य लोकांना विचारला.. यातील जवळपास सर्वांनीच सणांच्या नावाने काही सार्वजनिक मंडळे व  मंत्र्यांच्या नावाने ओळखली जाणारी मंडळे बोल्ड नृत्यांगनांना घेऊन जो अश्लील नंगा नाच करतात त्याची जोरदार टीका केली व या गोष्टीला जबरदस्त विरोध केला आहे.. हल्ली दहीहंडी अथवा इतर सार्वजनिक उत्सवांत पारंपरिकतेला हरताळ फासून जो बीभत्स नंगा नाच प्रमोट केला जातोय ही गोष्ट कुठेतरी थांबायलाच हवी असे लोक आता उघडपणे बोलत आहेत. आमचा कुठल्याच कलेला विरोध नाही मात्र कलेच्या नावाखाली अश्लील हावभाव करून यातील बहुतांश नृत्यांगना नाचतात व खाली असलेले तरुण सुद्धा त्यांना अतिशय चेकाळून प्रतिसाद देतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे असे लोकांनी स्पष्टपणे म्हटले आहे. आपल्याला या बद्दल काय वाटते ते नक्की सांगा.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

76

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.