शनिवार 10 ऑक्टोबर 2026 रोजी शब्द खड्ग चे विशेष प्रतिनिधी तथा अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे मुंबई अध्यक्ष अश्विन हेमंतकुमार केळकर यांचा वाढदिवस डोंबिवली पश्चिम येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला..
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी तथा प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे डोंबिवलीतील धडाडीचे सुप्रसिद्ध समाजसेवक शाम चौगले यांनी केले. त्यांना शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव, प्रकाश कदम, सुजितकुमार गुप्ता, रवींद्र शिंदे काका, साईनाथ खनपट, व्यंकटेश नायडू, उबाळे आणि इतर सर्व पदाधिकारी तथा मित्र मैत्रिणींनी सहकार्य केले..
याप्रसंगी विविध राजकीय पक्षांत कार्यरत असले तरी परस्परांमधील मैत्री, प्रेम आणि जिव्हाळा कायम असल्याचे या सोहळ्याने दाखवून दिले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपण्याची आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याची ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राजकारणापलीकडील मैत्रीचा आदर्श..
सध्याच्या राजकीय वातावरणात विविध पक्षांचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर येऊन आनंदाचा क्षण साजरा करतात, ही बाब विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी मैत्रीचे बंध कायम राहावेत, हा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
अश्विन केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि सर्वपक्षीय मित्रपरिवारातील जिव्हाळा पुन्हा अधोरेखित झाला. सर्वांनी अश्विन केळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
एकंदरीत, हा वाढदिवस केवळ आनंदोत्सव न राहता पक्षभेदापेक्षा मैत्री श्रेष्ठ, पदापेक्षा माणुसकी मोठी आणि राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची असतात, याची जाणीव करून देणारा स्नेहसोहळा ठरला.
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
- फोटोग्राफर - सुजितकुमार गुप्ता..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.