बाप्पाच्या पाठी कर कटीवर ठेऊन उभी असलेली विठु माऊली असा आकर्षक देखावा असलेल्या भाटिया कुटुंबीयांचा लाडका बाप्पा..
निळकंठ विहार को.हौ. सोसायटी, सुभाषरोड, नवापाडा, डोंबिवली पश्चिमेचे धडाकेबाज सेक्रेटरी श्री. मंजुल आणि सौ. प्रियंका भाटिया व त्यांची गोड मुलगी द्रष्टी यांचा हा लाडका बाप्पा भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा आहे. मंजुल व सौ. प्रियंका भाटिया हे लोकप्रिय आणि आदर्शवत तथा प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे कुटुंब असल्याने त्यांच्याकडे दर्शनार्थी लोकांची रांग लागणे स्वाभाविक आहे. हा बाप्पा खूपच मनमोहक असल्याने इथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रसन्न होते.. गेली अनेक वर्ष भाटिया कुटुंब बाप्पाची स्थापना करीत आहे. बाप्पामुळे आम्हाला नव नवी कामे करण्यास ऊर्जा मिळते असे मंजुल व प्रियंका यांनी शब्द खड्ग सोबत बोलतांना सांगितले.. तर गणपती बाप्पाच्या आगमनाने व त्याची आम्हाला सेवा करता येते यामुळे मला खूप आनंद होत असल्याच्या भावना द्रष्टी ने बोलून दाखविल्या..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.