डोंबिवली पश्चिम, नेमाडे गल्लीचा राजा..
सामाजिक कार्यकर्ते, शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी तथा सर्वांच्या मदतीला धावणारे शांत स्वभावाचे हुशार व्यक्तिमत्व असलेले व्यंकटेश नायडू अंकल यांच्या घरचा गणपती बाप्पा नवसाचा असल्याने इथे भाविकांची दर्शनाला रीघ लागते. व्यंकटेश नायडू अंकल यांच्या सोबत त्यांच्या मिसेस कस्तुरी नायडू, मुलगी निर्मला व तिचे मिस्टर तथा निर्मलाचा मुलगा दक्ष असे सर्व कुटुंब बाप्पाची मनोभावे सेवा करतात. नायडू अंकल खूप दिलदार असल्याने त्यांच्याकडे लोकांचा, नातेवाईकांचा राबता असतो. आम्ही बाप्पाची मनोभावे सेवा करतो व त्यामुळे आम्हाला आत्मिक आनंद मिळतो अशा भावना नायडू अंकल व त्यांच्या कुटुंबीयांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राकडे व्यक्त केल्या..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.