शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा 12 वा वर्धापनदिन डोंबिवली येथे धुमधडाक्यात संपन्न..

रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यालयात शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा 12  वा वर्धापनदिन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न..

अन्याय अत्याचाराचा बेधडक समाचार घेणारे संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव यांचे शब्द खड्ग वृत्तपत्र समाजाच्या सर्वांगाला स्पर्श करणारे मराठी, हिंदी आणि इंग्रजीत चालणारे वृत्तपत्र म्हणून पंचक्रोशीत सुपरिचित आहे. गेल्या बारा वर्षांत.. महिला, पुरुष, वृद्ध, पोलीस, महिला पोलीस, शिक्षक, तृतीय पंथीय, कविता, लेखन, आरोग्य, नवनिर्मिती करणाऱ्यांस प्रोत्साहन देणे, रेसिपी, जावे म्हणींच्या गावा, मनातले पान, संपादकीय, गुन्हे, व्यक्ती संस्था परिचय, विविध, माझी फोटोग्राफी, अन्याय अत्याचार झालेल्यांच्या बातम्या, दीन दुबळे लोक..  अशा विविध क्षेत्रांत आणि मागे पडलेल्या लोकांना गाणी, वक्तृत्व, पत्रकारिता, अभिनय आणि इतर सर्व गोष्टींत शब्द खड्ग प्रोत्साहन देत आलेलं आहे..

या प्रसंगी अलका बिर्जे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले..

आज रविवार रोजी व्यंकटेश नायडू यांना शब्द खड्ग चे विशेष प्रतिनिधी आणि सुजित गुप्ता यांना फोटोग्राफर म्हणून नेमण्यात आले आहे.

शब्द खड्गचा 12 व वर्धापनदिन  असल्याने सर्वांच्या उपस्थिती केक कापण्यात आला.. आणि उपस्थितांना नाष्टा देण्यात आला.. 

या प्रसंगी दिनकर सोमासे आणि निलेश गायकवाड यांनी शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार केला.. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नितीन खरात यांनी मंचाची शोभा वाढविली. तर, कार्यक्रम सर्वांग सुंदर करण्यात दिनकर सोमासे, निलेश गायकवाड, अश्विन, केळकर, साईली बनसोडे, सुनील बनसोडे, कल्पना बनसोडे, मनीषा ताई, लता जाधव, बाबू जाधव, शिवाजी जाधव, डॉ. उदयराज तळेकर, रवींद्र शिंदे, मेघना मिश्रा, हंसू अली, सरबर अली, सानिका जाधव, निर्मिती सावरकर, अलका बिर्जे, नेहा बिर्जे, आकांक्षा बिर्जे, ज्योती खडपे, मंगल पाटील, चव्हाण काका काकू, साऊंडवाले नवनाथ म्हात्रे, महात्मा गांधीचे हेडमास्तर सुनील कांबळी सर, शिंदे मावशी आणि मित्र परिवाराने खुप सहकार्य केले..या प्रसंगी उपस्थित माता भगिनींसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. 

सरतेशेवटी नितीन खरात, रमेश गभाले, कल्पना बनसोडे, ज्ञानेश्वर मराठे, संदीप उबाळे, निलेश गायकवाड, नेहा बिर्जे आणि प्रा. दिपक जाधव यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून वातावरणात रंग भरले.. 

खरे पाहिल्यास शब्द खड्ग वृत्तपत्राला 15 ऑगस्ट रोजी 12 वर्ष झाली मात्र स्वातंत्र्य दिन असल्याने सर्वांना सोयीस्कर पडावे म्हणून रविवार 16 ऑगस्ट रोजी शब्द खड्ग च्या 12 व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यात दिनकर सोमासे आणि साईली बनसोडे व शिवाजी जाधव, बाबू जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक जाधव यांनी केले.. 

- शिवाजी जाधव. व्यवस्थापक / विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

174

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.