मुंबईत फटाके फोडण्यावर निर्बंध आणि सुरक्षिततेबाबत वारंवार जनजागृती करूनही फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. ६ व ७ नोव्हेंबर रोजी मुंबईत आगीच्या तब्बल ८९ घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. यापैकी २८ आगीच्या घटना फटाक्यांमुळे घडल्याची माहिती उपलब्ध आकडेवारीतून समोर येते. या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
डोंबिवलीतील आग दिवाळीच्या फटाके अथवा रॉकेटने लागली की कशाने लागली हे कळू शकले नाही.. रविवारी रात्रीच्या सुमारास घडली घटना..
कितीही खबरदारी घेतली तरी अशा दुर्दैवी घटना घडतातच. डोंबिवली गणेशनगरात पोलीस चौकीच्या बाजूला पार्क केलेल्या गाड्या गॅरेजवाल्याने उभ्या केल्या होत्या की इतर कुणी हे सांगायला कुणी पुढे आले नाही.. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एखाद्या फटाक्याने अथवा रॉकेटने ही आग लागली असावी असे मत मांडले.. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की गाडीखाली असलेली कुत्रीची सात ते आठ नवजात अर्भके आगीच्या भक्षस्थानी पडली. शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी दिनकर सोमासे आणि त्यांचे मित्र मयूर ठाकरे यांनी या आगीतून एक गाडी कशीबशी वाचविली. आगीचा भडका खूप वाढल्याने सोमासे आणि ठाकरे यांना कुत्रीची पिले मात्र वाचविता आली नाहीत. नंतर फायरब्रिगेड वाल्यांनी पंधरा वीस मिनिटांत ही आग विझवली. कुत्रीने सुद्धा तिची पिले वाचविण्याचा खूप प्रयत्न केल्याचे विदारक दृश्य उपस्थितांनी पहिले. तर बहूतांश लोकांनी अशा स्वरूपाच्या फटाक्यांवर कायमची बंदी घालण्याची सरकारकडे मागणी केली..
- दिनकर सोमासे. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.