स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघालेल्या कल्याणमधील भरांबे कुटुंबाच्या प्रवासाचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शेळफळ आणि तेलंगवाडी गावांदरम्यान शुक्रवारी दुपारी कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत आठ वर्षांच्या चिमुरड्यासह त्याच्या आजी-आजोबांचा मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर जखमी झाले..
या अपघातात पार्थ तुषार भरांबे (८), आजोबा विलास चांगू भरांबे (६६) आणि आजी शोभा विलास भरांबे (६३) यांचा मृत्यू झाला. तर वडील तुषार विलास भरांबे आणि आई पूनम तुषार भरांबे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.