सोशल मीडियावर अश्लील, आक्षेपार्ह किंवा फसवणूक करणारे रील्स अथवा व्हिडिओ बनवणे आणि अपलोड करणे भारतीय कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा आहे..
कायदेशीर कारवाई व कलमे:
आयटी ॲक्ट, कलम ६७ (IT Act, Sec 67): इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून अश्लील मजकूर प्रसिद्ध किंवा प्रसारित केल्यास ३ वर्षांपर्यंत कैद आणि ₹५ लाखांपर्यंत दंड.
आयटी ॲक्ट, कलम ६७ (अ) [Sec 67A]:
लैंगिकदृष्ट्या स्पष्ट किंवा अश्लील कृत्य प्रसारित केल्यास ५ वर्षांपर्यंत कैद आणि ₹१० लाखांपर्यंत दंड.
भारतीय न्याय संहिता (BNS): सार्वजनिक ठिकाणी किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लीलता पसरवल्यास कठोर दंडात्मक कारवाई.
सावधान!
तुमचा एक रिल्सचा व्हिडिओ तुम्हाला थेट तुरुंगात पाठवू शकतो.
डिजिटल जगतात प्रत्येक कृतीवर सायबर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.
कायद्याचे पालन करा आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा!
- जनहितार्थ जारी :
शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
- संपादक: प्रा. दिपक जाधव..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.