शहापूर महामार्ग पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठतेमुळे चोरीची रिक्षा मूळ मालकाला परत मिळाली..

मूळ मालक बबन मोरे यांच्या ताब्यात रिक्षा दिल्याने परिसरातून चेरपोली - शहापूर वाहतूक पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षावहोत आहे.. 

नवी मुंबई पावणे गाव गावदेवी मंदिर परिसरातून बबन धोंडीराम मोरे यांची रिक्षा 31 ऑगस्ट 2026 रोजी चोरीस गेली होती. मोरे यांनी या रिक्षा चोरीचा गुन्हा तुर्भे पोलीस ठाण्यात नोंदविला होता. दरम्यान 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी साडेनऊ च्या सुमारास मुंबई आग्रा नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर येथील चेरपोली जवळ पेट्रोलिंग सुरु असताना आटगाव कॉम्प्लेक्स जवळ संशयास्पद अवस्थेत ही रिक्षा पोलिसांच्या निदर्शनात आली. शहापूर वाहतूक पोलिसांनी तात्काळ तुर्भे पोलिसांशी संपर्क साधून या रिक्षाचे सर्व डिटेल्स घेतले. व सदर रिक्षा तिचे मूळ मालक बबन मोरे यांच्या ताब्यात देण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक छाया कांबळे, पोलीस हवालदार संजय आवटे, पोलीस अंमलदार पानसरे, देवकते यांनी सहभाग नोंदविला.. आपली रिक्षा परत मिळाल्याने रिक्षामालक बबन मोरे यांनी शहापूर वाहतूक पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.. 

- दिनकर सोमासे. फोटोग्राफर शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

58

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.