श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. मन हिरवे ऋतू हिरवा चोहीकडे घुमे आनंदी पारवा.. पण, हे असे कधी होईल तर आपण निसर्ग जपला आणि वृक्षारोपण करून जोपासला तर.. आज काँक्रीटच्या जंगलात आपण हरवले आहोत. इमारती आणि रस्ते बनविण्याच्या नादात आपण बेसुमार झाडांची कत्तल करीत आहोत.. निसर्गाने आपल्याला दहा हाताने दिले आहे पण आपली झोळीच फाटकी असल्याने निसर्ग तरी काय करणार? मात्र, अजूनही शहरांत काही ठिकाणी वनराई जपलेली दिसत आहे. हाच निसर्गाचा हिरवा पिसारा व तोही टिटवाळा येथील मोबाईल मध्ये टिपला आहे शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी मकरंद खाडे यांनी..
- मकरंद खाडे.. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.