डोंबिवली ट्रॅफिक विभागातर्फे मोठा गाव मानकोली ब्रिज येथे नियमभंग करण्याऱ्या वाहनांवर कारवाई..

सविस्तर वृत्त असे की, मोठा गाव मानकोली ब्रिज येथून रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांवर तसेच नियम भंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर व ट्रिपल सीट बसलेल्या दुचाकी वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कायदेशीर कारवाई केल्याने नागरिकांनी तथा प्रवाशांनी वाहतूक विभागाला धन्यवाद दिले आहेत.. 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहनधारकांनी मोठागाव ब्रिज इथून रॉंग साईडने वाहन चालवू नये याबाबत जाहीर डोंबिवली वाहतूक विभागाने रिक्षा, दुचाकी तथा चारचाकी वाहनचालकांना आवाहन केले आहे.

तसेच, यापुढे मोठा गाव ब्रिज येथून रॉंग साईडने येणाऱ्या वाहनावर करण्यात येणारी कारवाई चे अभियान अधिक तीव्रपणे रबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांनी सांगितले आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

16

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.