जव्हारमध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, तीन गंभीर; हिरडपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सखोल चौकशीची मागणी..

जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील गगनगिरी अनुदानित आश्रमशाळेतील पाच विद्यार्थ्यांच्या दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले..

जव्हार : तालुक्यातील हिरडपाडा येथील गगनगिरी अनुदानित आश्रमशाळेतील पाच विद्यार्थ्यांच्या दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच विद्यार्थी रात्री गरबा खेळण्यासाठी सारसून येथे गेले होते. त्यांनी एका दुकानदाराकडून दुचाकी घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकाच दुचाकीवरून पाच विद्यार्थी गरबा खेळून रात्री आश्रमशाळेकडे परतत असताना हा अपघात झाला.

या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. सुमित मोतीराम गिंभल, प्रीतम पोटिंदा यांचा मृत्यू झाला असून सुमित मोरे, रुस्तुम पोटिंदा, सुजित पोटिंदा हे तिघे जखमी झाले.

या दुर्घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्रीच्या वेळी विद्यार्थी आश्रमशाळेबाहेर कसे गेले, त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याची व्यवस्था होती का आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हाती दुचाकी कशी आली, याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सुरक्षेतील त्रुटी दूर कराव्यात

विद्यार्थ्यांच्या निवासासह त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आश्रमशाळा प्रशासनावर असते. त्यामुळे या घटनेत सुरक्षाव्यवस्थेतील काही त्रुटी होत्या का, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. चौकशीत संबंधितांची निष्काळजी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

गगनगिरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटनाबाबत या संस्थेला चौकशीची नोटीस बजावली आहे.

- पी. के. सिद्धार्थ रामकुमार, प्रकल्प अधिकारी, आत्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार

49

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.