दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार..

मध्य रेल्वेने दिवाळीनंतर कसारा मार्गावर आणखी १८ पंधरा डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे..

मुंबई : मध्य रेल्वेने दिवाळीनंतर कसारा मार्गावर आणखी १८ पंधरा डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. सध्या धावत असलेल्या बारा डब्यांच्या लोकलच्या जागी या पंधरा डब्यांच्या लोकल धावणार आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरीतील प्रवासी वाहून नेण्याची क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराचे काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले असून, त्यानंतर या लोकल सुरू करण्याची योजना आहे.

पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी मध्य रेल्वेकडून कल्याण-कसारा विभागात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. टिटवाळा स्थानकात रुळांशी संबंधित कामे, सिग्नल यंत्रणेतील सुधारणा, ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा वाहतूक व विद्युत ब्लॉक घेतला होता. कसारा, टिटवाळा आणि आसपासच्या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वाढीव क्षमतेचा फायदा होऊ शकतो. गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांची मोठी कोंडी होते.

फेऱ्यांची संख्या ७२वर जाणार

कसारा मार्गावरील १८ लोकल फेऱ्यांचे पंधरा डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर झाल्यानंतर अशा फेऱ्यांची एकूण संख्या ७२ होणार आहे. उपनगरीय हद्दीबाहेरील तसेच लांब अंतरावरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ अपेक्षित आहे. गर्दीचा ताण किती कमी होईल, हे प्रवाशांच्या गर्दीवर अवलंबून असेल.

38

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.