पाऊस ऐन भरास आलेला असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, एमएमआरडीए, तथा जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले नगरसेवक डोंबिवली पूर्व पश्चिमेतील खड्ड्यातील रस्ते अजूनही पूर्णपणे दुरुस्त करू शकले नसल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक, रिक्षावाले आणि नागरिकांत नाराजी पसरली आहे..
रस्त्यांवरील खड्ड्यांची अवस्था बघून डोंबिवली वाहतूक विभागातील वाॅर्डन गणेश साळवे व वाॅर्डन शिवाजी बागल यांचे हृदय द्रवले व त्यांनी चार रस्ता येथे रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धिम्या गतीने होत आहे व वाहनचालकांना खूप त्रास होत आहे हे पाहून तेथील खड्ड्यांमध्ये स्वतः दगड खडी टाकून रस्त्यातील खड्डे बुजवण्यास भर पावसात सुरुवात केली. त्यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा कमी झाला. यामुळे डोंबिवलीतील खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून होणारी वाहतूक कोंडी सोडवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून पुन्हा होत आहे. जे काम या डोंबिवली वाहतूक विभागातील वाॅर्डन गणेश साळवे व वाॅर्डन शिवाजी बागल यांनी केले ते काम खरे तर संबंधित विभागातील नगरसेवकाने महापालिकेच्या मागे लागून करून घ्यायला हवे होते. आतातरी संबंधितांना जाग येईल का असा प्रश्न डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिक संबंधितांना विचारीत आहेत..
- दिनकर सोमासे. कॅमेरामन शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.