डोंबिवली शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून जरी सुपरिचित असली तरी वाढती लोकसंख्या आणि अपुरा पोलीस फाटा हा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र, या सर्वांवर मात करीत डोंबिवली वाहतूक विभाग त्यांचे काम चोखपणे बजावीत आहे..
पण, काही रिक्षाचालक प्रवाशांसोबत उद्धटपणे वागतात. छोट्यामुलांकडून देखील भाडे वसूल करण्यासाठी त्यांच्या पालकांशी हुज्जत घालतात व वाहतुकीला अडथळा आणतात. त्याच प्रमाणे दुचाकी स्वार देखील भरधाव बाईक पळवतात. या सर्वांवर आळा घालण्यासाठी डोंबिवली वाहतूक शाखेत नव्याने रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय अहिरे साहेब आणि पीएसआय कदम साहेब त्याच बरोबर वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन यांच्या पथकाने अहिरे साहेबांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या तृप्ती हॉटेल समोरच्या रिक्षा स्टॅण्डवर असलेल्या वाहतुककोंडीचा धडक कारवाई करीत आढावा घेतला यात अनेक बेशिस्त रिक्षा आणि बाईक चालक आढळून आले. अहिरे साहेब करीत असलेल्या कारवाईचे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. अशीच नियमितपणे डोंबिवली विभागात बेशिस्त रिक्षावाले आणि स्टेशन परिसरात प्रवासाला अडथळा ठरणाऱ्या मोठ्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीतील नागरिक करीत आहेत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.