रविवार 29 नोव्हेंबर 2026 रोजी होणार असणाऱ्या डोंबिवली मॅरेथॉनच्या निमित्ताने डोंबिवलीत सकाळी 4 ते 11 वाजेपर्यंत वाहतूक मार्गांत काही बदल केले गेले असल्याचे डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांनी सांगितले आहे..
प्रवेशबंदी असलेले प्रमुख मार्ग :
छत्रपती शिवाजी महाराज सर्कल डोंबिवली पूर्व, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी रोड, नेहरू रोड, फडके रोड, मानपाडा रोड, टंडन रोड आदी मार्गांचा यात समावेश असणार आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या वाहतूक मार्गांचा वाहनचालकांनी वापर करण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.
मॅरेथॉनच्या दिवशी सकाळी 4 ते 11 या वेळेत वाहतूक बदलांचे पालन करावे.
वाहतूक पोलिसांनी लावलेले दिशादर्शक फलक व बॅरिकेट्स यांचे पालन करावे.
अत्यावश्यक कामाशिवाय वाहतूक बदल लागू असलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा.
रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सहकार्य करावे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.