डोंबिवली पश्चिमेत रिक्षावाल्यांची मनमानी भाडेवाढ सुरूच.. KDMC ने मिनी बस सुरु करावी अशी प्रवाशांची मागणी..

डोंबिवली पश्चिमेत रिक्षावाल्यांच्या संघटनांनी सरकारचे तथा RTO चे कुठलेही भाडेवाढ परिपत्रक नसतांना मनमानी पद्धतीने रिक्षाचे 15 रुपयांच्या ठिकाणी 20 रुपये भाडे केल्याने प्रवाशांमध्ये खूप नाराजी आहे..

RTO ने सुद्धा या विभागात काही रिक्क्षावाल्यांवर धडक कारवाई केली आहे व दंड वसूल केला आहे. मात्र, हे रिक्षावाले आणि त्यांच्या संघटना RTO ला दाद देत नसल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. यातील काही रिक्षावाले प्रवाशांना दमदाटी सुद्धा करीत असल्याचे कानी आले आहे. डोंबिवलीतील अनेक सुजाण प्रवाशांसोबत चर्चा केली असता कल्याण-डोंबिवली महानगरपालिके डोंबिवली पश्चिमेत पालिका परिवहनच्या मिनी बसेस सुरु कराव्यात म्हणजे या रिक्षावाल्यांची मुजोरी थांबेल असे प्रवासी म्हणत आहेत. तर सर्वच गोष्टींची भाववाढ झाल्याने आम्ही काय कमवायचे व काय घरी द्यायचे असा आमच्या समोर प्रश्न पडला असल्याच्या भावना रिक्षावाल्यांच्या आहेत. आता यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून प्रवासी व रिक्षावाल्यांमध्ये समेट घडवून आणावा असे जाणकार म्हणत आहेत.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

33

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.