नुकतीच भुलेश्वर येथे गणपती बाप्पाची बावीस फुटी मूर्ती कोसळून दोन भाविकांचा जीव गेला. या पूर्वीही ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने अपघात घडले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याच संदर्भात शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांसी संवाद साधला असता लोकांनी रोखठोक मते मांडली..
लोकांच्या मते मोठेपणा मिरविण्यासाठी आणि मिळविण्यासाठी बहुतांश गणेशोत्सव मंडळे उंचच उंच मूर्ती बनवितात. पण या मूर्ती जशा स्थापनेसाठी आणताना त्रास होतो तसाच त्या विसर्जनाला सुद्धा खूपच त्रासदायक ठरतात.. त्यात खूपशा मूर्ती शाडूच्या नसल्याने प्रदूषण सुद्धा होते असेही अनेकांनी सांगितले.. जर खरच मनात भाव असेल तर अगदी अर्ध्या फुटाची मूर्ती सुद्धा चालते. आणि म्हणून सरकारने यात लक्ष घालून दोन किंवा अडीच फुटा पेक्षा ज्यास्त उंच बाप्पाची मूर्ती बनविण्याची कुणालाच परवानगीच देऊ नये. प्रश्न श्रद्धेचा आहे बडेजाव मिरविण्याचा नाही असेही लोक स्पष्टपणे म्हटले.. यावर आपले मत काय आहे हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.