मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारांत कोथिंबीरची एक जुडी चक्क ४० ते ४५ रुपयांवर पोहोचलीये. एपीएमसी मार्केटमधील आवक थेट ५० टक्क्यांनी घटल्याने..
नाशिक, पुणे, साताऱ्या उत्पादक पट्ट्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामानातील लहरीपणाने शेतातच कोथिंबीर सडली. त्यातच वाहतूक खर्च वाढल्याने एपीएमसी मार्केटमधील आवक थेट ५० टक्क्यांनी घटली आहे. बाजारात मागणी प्रचंड आणि पुरवठा अल्प, अशी स्थिती निर्माण झाल्याने चांगल्या दर्जाच्या कोथिंबीरचे भाव गगनाला भिडले आहेत.
स्थानिक आणि इतर जिल्ह्यांमधील नवीन पिकांची काढणी पूर्ण होऊन बाजारात आवक सुरळीत होईपर्यंत ग्राहकांना या महागाईचा सामना करावा लागणार आहे. पालेभाज्यांच्या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. शब्द खड्गने या संदर्भात अनेक गृहिणींशी चर्चा केली असता मोदी सरकार हे गरिबांच्या जीवावर उठले आहे. आज सर्वच जीवनावश्यक गोष्टींचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांनी जगायचे कसे असा सवाल या माता भगिनी विचारीत आहेत..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.