छठपूजे निमित्ताने घडलेल्या दोन दुर्दैवी घटना..
तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी विशेष उपकरणांचा वापर केला. पाण्याखाली शोध घेण्यासाठी टेलिस्कोपिक कॅमेऱ्याचीही मदत घेण्यात आली.
ठाणे : छठपूजेच्या विधीदरम्यान कळवा येथील तलावात बुडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १६) सकाळी घडली. धार्मिक विधीसाठी तलावात उतरलेल्या या तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम सुरू केली. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव प्रदीप गुलाब विश्वकर्मा (वय २०) असे असून तो कळवा येथील भास्कर नगरमधील यादव चाळीत राहत होता. सोमवारी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास कळवा पूर्वेकडील मफतलाल कंपाऊंड परिसरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या तलावात ही दुर्घटना घडली. छठपूजेच्या विधीसाठी प्रदीप पाण्यात उतरला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
समस्तीपूर : प्रसाद खाल्ला म्हणून आईने मारल्याने चिमुकलीचा मृत्यू..
समस्तीपूर : छठपूजेसाठी बनवलेला प्रसाद खाल्ल्याच्या रागातून आईनेच आपल्या चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात घडली आहे. या मारहाणीनंतर मुलीची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव सुहानी कुमारी (वय ४) असे असून ती राजू पासवान आणि रीना कुमारी यांची मुलगी होती. छठपूजेनिमित्त पासवान कुटुंबीय सणाच्या तयारीत व्यस्त होते. कुटुंबातील इतर सदस्य पूजेच्या तयारीसाठी जवळच्या घाटावर गेले होते. त्यावेळी रीना घरी पूजेसाठी प्रसाद तयार करत होती.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.