15 ऑगस्ट च्या निमित्ताने..

राजकीय पक्षांच्या शक्ती प्रदर्शनात शाळकरी विद्यार्थी भरडले जात आहेत.. शिक्षक आणि पालकांचा संबंधितांना संतप्त सवाल.. 

राजकीय पक्षांतील सत्तास्पर्धा आणि आम्हीच कसे देशसेवक आहोत व आम्हाला भारताबद्दल खूप प्रेम आहे आणि आमची देशभक्ती किती महान आहे हे लोकांना दाखविण्यासाठी आणि क्षणिक रेकॉर्ड करण्यासाठी विविध राजकीय पक्ष ते स्वतः काढीत असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत शाळकरी विद्यार्थ्यांना समाविष्ठ करून अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांवर यांचे पक्षीय राजकारण लादत असल्याने खूपसे शिक्षक व पालक नाराज झाले आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर या शिक्षक आणि पालकांनी राजकीय पक्षांच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याच्या भूमिकेची जोरदार टीका केली आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन  हे प्रत्येक शाळा आपल्या शाळेतील आवारात साजरे करीत असते व शाळा जर त्यांच्या शाळेचे बॅनर घेऊन स्वतंत्रपणे जर गावातून, शहरातून देशप्रेमाची रॅली काढीत असेल तर ती गोष्ट वेगळी. मात्र, राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी शाळकरी मुलांना, हेडमास्तरांना वेठीस  धरीत असतील तर ते चूक असल्याचे अनेक पालक, शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, अंधेरी नगरी चौपट राजा.. अशी सध्याची परिस्थिती झाली आहे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी देशप्रेमाचा उमाळा येणाऱ्या राजकीय पक्षांच्या या बेबंदशाहीला आणि मुक जुलुमाला कोण आणि कशी वाचा फोडणार असा खरा प्रश्न आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

57

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.