मद्यपी रिक्षा चालकाची डोंबिवली येथील फडके रोडवर तरुणीला धडक..

वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी रिक्षाचालक दारू पिले आहेत की नाही याची तपासणी करावी व दारुड्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी लोकांची मागणी.. 

सविस्तर वृत्त असे की, डोंबिवलीतील फडके रोडवर मद्यधुंद रिक्षाचालकाने पादचारी तरूणीला जोराची धडक दिली. वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालक रमेश पाटील याला ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकात मंगळवारी रात्री आठ वाजता मद्य सेवन केलेल्या एका रिक्षा चालकाने रिक्षेवरील स्वताचे नियंत्रण सुटल्याने एका पादचारी तरूणीला रिक्षेची जोराची धडक दिली. या धडकेत या तरूणाच्या हात आणि कपाळाला जोराचा फटका बसला.

रिक्षेची धडक बसताच पादचारी तरूणी काही अंतर दूर फेकली गेली. तिने स्वताला सावरले. या घटनेनंतर रस्त्यावरील इतर पादचाऱ्यांनी या तरूणीला धीर दिला. तिला अचानक जोराची धडक बसल्याने ती घाबरली होती. पादचाऱ्यांनी रिक्षा चालकाला या कृत्याबद्दल जाब विचारला. तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला.

रिक्षा चालकाने मद्य सेवन केले आहे, हे लक्षात आल्यावर काही जागरूक नागरिकांनी तात्काळ डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांना संपर्क केला. अहिरे यांच्या सूचनेवरून तात्काळ हवालदार सांगळे आणि एक वाहतूक सेवक तातडीने फडके रोडवर मदन ठाकरे चौकात दाखल झाले. रिक्षाचालक दारू पिलेला आहे असे लक्षात येताच प्रवाशांनी स्थानिक वाहतूक पोलिसांशी संपर्क साधावा असे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.. 

- दिनकर सोमासे. फोटोग्राफर शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

17

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.