शिव राज्यभिषेकाचे औचित्य साधून केडीएमसीने महाराजांच्या स्मारकास विद्युत रोषणाई करण्याची नगरसेविका अपर्णा भोईर यांची मागणी..

कल्याण : अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 16 74 रोजी संपन्न झाल्याचे सर्वश्रुत आहे..

याच पार्श्वभूमीवर येत्या 6 जून रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या महानगरपालिकेच्या शेजारी असलेल्या शिव छत्रपती स्मारकास स्वच्छ करून या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात यावी व महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्याची नवीन पिढीला जाणीव करून द्यावी अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 (ब) च्या नगरसेविका तथा शिक्षण मंडळ सदस्या सौ. अपर्णा संतोष भोईर यांनी एका पत्रा द्वारे  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना केली आहे..

60

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.