कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..
कारण मातृभाषे सोबत आपली नाळ जोडली गेलेली असल्याने आपल्याला विषय समजणे जड जात नाही. मात्र हल्ली दुर्दैवाने इंग्रजीचं स्तोम इतकं वाढलेलं आहे की, पालक आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवितात. मराठी शाळा आणि शिक्षक खाजगी शाळा तथा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि शिक्षकांसारखे अपडेट नसतात असाही आरोप केला जातो. मातृभाषेत शिकूनही मुले पुढे जातात हे आपल्याला ठाऊक आहेच ना. चीन जपान, रशिया आणि इतर बऱ्याच देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेला जास्त महत्व दिले जाते आणि तरीही ते लोक आपल्यापेक्षा शेकडोपटीने सर्वच गोष्टींत पुढे आहेत..
खूपशा मराठी खाजगी आणि सरकारी अनुदानित शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत..
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत अनुदानाचा अभाव, कमी पटसंख्या आणि संचमान्यतेच्या अटींमुळे हजारो मराठी शाळा बंद पडल्या आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या १० वर्षांत मुंबई महापालिकेच्याच १०० हून अधिक मराठी शाळा बंद झाल्या आहेत. एका अंदाजानुसार, गेल्या ५ वर्षांत राज्यातील ८५० हून अधिक सरकारी शाळा बंद पडल्या आहेत.
महत्वाचे मुद्दे:
मुंबईतील स्थिती: मुंबई शहर व उपनगरात गेल्या सात वर्षांत मराठी शाळांची संख्या ४६१ वरून कमी झाली असून, सध्या सुमारे ५७ मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
राज्यभरातील स्थिती: गेल्या १०-१५ वर्षांत हजारो विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळा, विशेषतः ग्रामीण भागात, निधीअभावी बंद झाल्या आहेत.
पटसंख्येचे कारण: कमी पटसंख्येचे कारण देऊन अनेक शाळा बंद करण्यात आल्या असून, त्यामुळे २५ हजारांहून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
परिणाम: यामुळे मराठी माध्यमाच्या शिक्षणावर परिणाम होत असून, शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही टांगती तलवार आहे. तात्पर्य काय तर आपण आपली मुले मराठी माध्यमांच्या शाळांत शिकवायला हवी आणि त्या शाळांनी तथा तेथील शिक्षकांनी खाजगी इंग्रजी शाळेतील शिक्षकांप्रमाणे अपडेट राहण्याची गरज असल्याने अनेक पालकांनी शब्द खड्ग सोबत बोलतांना बोलून दाखविले..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.