लोकशाही पर्व फक्त कागदावरच राहिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये..
छुपी हुकूमशाही मागच्या दाराने आपल्या घरात घुसली ती सुद्धा चक्क आपल्या डोळ्यादेखत. मात्र, आपल्यातील फार मोठा वर्ग व्यक्तिपूजेच्या मागे लागल्याने अंधभक्त झाला आहे. झोपी गेलेल्याला झोपेतून जागं करता येतं. मात्र, झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागं करणार ?
आपण सर्व मतदार आणि भारताचे नागरिक म्हणून तथा मीडिया, पोलीस, न्यायपालिका, निवडणूक आयोग आणि इतर बरीचशी सरकारी खाती आपल्या समोर अगदी सर्वच क्षेत्रांत अनागोंदी चालली आहे हे माहित असूनही आपला आवाज म्हणावा तेवढा तीव्र करीत नाही.. खूपशा यंत्रणा पैसे देऊन आणि दडपशाहीच्या जोरावर सरकारने विकत घेतल्या आहेत हे आता सर्वश्रुत आहे.
निवडून आल्यावर पक्ष बदलणाऱ्यांवर कायदेशीर बंधन घालावे..
तुम्हाला निवडून आल्यावर जर पक्षांतर करावयाचे असेल तर तो गुन्हा समजावा. जर तुम्हाला पक्ष बदलायचाच असेल तर एकतर तुम्ही राजीनामा द्या किंवा पाच वर्ष ज्या पक्षातून निवडून आलेले अहात त्याच पक्षात रहा..
लोकशाहीत बिनविरोध निवडून आलेल्या लोकांना ग्राह्य धरूच नये. निवडणुकीत हार जीत अपेक्षित असल्याने निवडणुका या प्रत्यक्ष लढविल्या जाव्यातच. काही महाभाग पैसे आणि दमदाटी करून समोरच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पडतात असे होता काम नये..
निवडून आल्यावर आपण ज्या पक्षाच्या आणि लोकांच्या जीवावर निवडून आलो त्यांच्याशी गद्दारी करून मधेच पक्ष बदलणाऱ्यांवर कायमची इलेक्शन बंदी लादावी आणि लोकशाहीत निवडणुका बिनविरोध न करता त्या लढविल्या जाव्यात.. दमदाटी करून सरकारी कर्मचारी व कुणावरही हात टाकणाऱ्या राजकारणी लोकांना राजकारणातून कायमचे बाद करावे व त्यांना कायद्याने कडक शासन व्हावे. तसेच पोलिसांना गुंडांची गुलामी करायची नसते या संदर्भात समज द्यावी.. तूर्तास एवढेच.. याबद्दल आपल्याला काय वाटते..??
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.