सर्वपक्षीय नेते म्हणजे एका माळेचे मणी..

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

पण या कार्यकर्त्यांना हे ठाऊक नाही की आज रोजी दिवा घेऊन फिरले तरी चांगला नेता मिळण्याची शक्यता कमीच आहे. जाती - पातींची भांडणे लावून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी नेते मंडळी स्वतःच्या आई बापाचे होत नाहीत तर तुमचे आमचे आणि देशाचे काय होणार. फक्त मिळतील त्या मार्गाने पैसे कमवायचे आणि पडद्यामागून एकमेकांशी हातमिळवणी करायची हे यांचे धंदे आहेत. लोकशाही कधीच संपुष्टात आलेली आहे व आता हुकूमशाही पर्व सुरु झालेले आहे. कार्यकर्त्यांना एकमेकांत झुंजविणारे नेते सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करतात. म्हणून कार्यकर्ते आणि तरुणांनी यांचं ऐकून दंगे करूच नयेत. दुर्दैवाने आज रोजी पाया पडावे असा एकही नेता अस्तित्वात नसल्याने जर पुढे मागे भारतात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर आम्हाला अजिबात नवल  वाटणार नाही.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

177

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.