देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..??

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

आणि  म्हणून मी माझ्या स्वतःच्या पातळीवर सध्या सुरु असलेल्या व अंधभक्त तथा गोदी मीडियाने जे भाजपला डोक्यावर घेतल्याचे  जे खोटे चित्र रंगविले आहे त्याविरुद्ध एल्गार पुकारलेला आहे. जर असेच चालत राहिले व लोक संविधान आणि देश मारू पाहणाऱ्या भाजप विरोधात रस्त्यावर उतरले नाहीत तर देश नक्कीच रसातळाला जाईल.. नव्हे नव्हे देश रसातळाला गेलाच आहे. खरे तर भ्रष्ट राजकारणी, अंधभक्त आणि गोदी मीडिया यांना एकटे पाडण्याची गरज आहे. पण अजूनही म्हणावा तसा या लोकांना तीव्र विरोध होत नाही.  

आपल्याला काय करायचे आहे ही विचारसरणी डोक्यात भिनल्याने एकूणच समाज आणि देशाप्रती आपल्या संवेदना मरू लागल्या आहेत.. आणि हेच लोकशाहीला घातक आहे.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

195

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.