नेहरूंची आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही..

मोदींनी नेहरूंपेक्षा जास्त काळ पंतप्रधान पद  भोगले यावरून अंधभक्त, गोदी मीडिया आणि भाजप ही लोकं मोदींवर स्तुती सुमने उधळीत आहेत. अरे पण कुठे नेहरू ज्यांनी NIT, IIT, IIM, AIIMS, ISRO, DRDO, ONGC, BHEL, HAL, BARC, CSIR, NID, या क्षेत्रांत भरीव काम केले आणि शिक्षण, पाण्याची धरणे, रोजगार इत्यादी अनेक पातळ्यांवर भरीव काम केले आहे..

आणि मोदींनी काय केले तर करोडो रुपयांचा चुराडा करून मंदिरे बांधली, लोकांना अंधभक्तीकडे घेऊन गेले, भरमसाठ थापा मारून एकही काम केले नाही. लोकशाहीची गळचेपी सुरु ठेवली आहे, देश अमेरिका आणि भांडवलदारांच्या घशात घातला, हजारो शाळा बंद पाडल्या, सर्वच प्रकारच्या गोर गरिबांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या गॅस, वीज, पाणी, घरे, प्रवास अशा गोष्टींच्या किमती वाढविल्या, मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून परदेश दौरे करीत आहेत. पत्रकारांना थेट उत्तरे देण्याची मोदींची हिंमत नाही. नेहरू सुशिक्षित होते आणि मोदी चवथी नापास आहेत असे बोलले जात आहे. मोदींच्या काळात हिंदू सुरक्षित नाही अशी मुद्दाम बोंब ठोकून मुसलमान आणि दलितांची वाट लावण्याचे प्रकार सुरु आहेत. गुंड आणि घोटाळेबाज मोदींच्या पक्षांत आहेत. महिला, मुली सुरक्षित नाहीत, रोजगार नाही, नोकरी नसल्याने तरुण वैफ़ल्यग्रस्थ झाले आहेत. मोदींनी मीडियाला विकत घेऊन त्यांनी न केलेल्या कामांच्या टाळ्या आणि थाळ्या वाजवीत आहेत. थोडक्यात काय तर नेहरू ग्रेट होते आणि मोदी अजिबातच ग्रेट वगैरे नाहीत. मोदी दडपशाही, विकत घेतलेली न्यायव्यवस्था, ईव्हीएम मशीन,  ईडी, सीबीआय, अंधभक्त, हिंदू खतरे मे अशा बोंबा ठोकून निवडून आले आहेत. आणि म्हणून त्यांची आणि नेहरूंची तुलना होऊच शकत नाही..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

71

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.