लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात धन्यता मानली आहे..
खरे तर हे पत्रकारितेचे अपयश आहे आणि या नालायक पत्रकारांमुळे सर्वसामान्य चांगल्या पत्रकारांकडे सुद्धा संशयाने पाहिले जात आहे. मोदींची अनावश्यक शेखी मिरविणाऱ्या गोदी मीडिया मुळे देश रसातळाला चालला आहे. विद्यार्थी, पेपर फुटी, कामगार, महागाई, रोजगार, वीज, गॅस, इंधन, वाहतूक इत्यादी इत्यादी प्रश्नांवर या पत्रकारांनी बोलण्याची गरज असतांना हे पत्रकार मोदी आंबा कापून खातात की पिळून खातात, मेलोनी आणि चॉकलेट आणि मोदीच कसे बरोबर हे सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याने या गोदी मीडिया आणि त्यांच्या चॅनेलला सर्वसामान्य लोकांनी बायकॉट करून टाकावे असे सांगावेसे वाटते आहे. आता तर हे माजोरी पत्रकार युट्यूब वर शिकविणाऱ्या शिक्षकांच्या पाठी लागले आहेत. खान सरांसारखे शिक्षक भारतातच नव्हे तर भारता बाहेर सुद्धा प्रसिद्ध आहेत. अंजना ओम कश्यप सारखी मोदींची चाटू पत्रकार खान सरांची टीका करीत होती मात्र, सर्व शिक्षकांनी तिचे चांगलेच बारा वाजविले. तात्पर्य काय तर देशाचे बारा वाजवायला सरकार बरोबरच, गोदी मीडिया आणि अंधभक्त कारणीभूत आहेत. आता जास्त वेळ वाट न बघता गोदी मीडियाला सर्वसामान्य लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या लोकांनी रस्त्यावर पळवून पळवून फटके द्यायला हवेत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.