आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..
गॅस सिलेंडर मिळत नाही तर गटारातून गॅस मिळवा.. आठवड्यातून दोन दिवस उपवास करा.. प्रवास टाळा.. आणि तसेही विमानांचे किती अपघात होतात.. नका करू विमान प्रवास नाहक मेलात तर ? सगळ्या गोष्टींची काटकसर करा.. आणि हो अगोदरच सांगतो आजारी पडू नका आणि पडलात तर खुशाल मरा आपल्याकडे पैसे नाहीत.
अमेरिकेने जरी जगाला युद्धात लोटले तरी अमेरिकेचे तळवे चाटा.. रशियाशी, इराणशी गद्दारी करा.. अमेरिकेला फक्त आईच नाही तर बाप सुद्धा म्हणा.. अहो असं काय करता एपस्टीन फाईल मध्ये मोदीसाहेबांचं नाव आहे.. जर त्या फायलींचा उदोउदो केला तर देशाची इज्जत जाईल हो म्हणून गप्प बसा..
आणि काय झालं गृहमंत्री अमित शहा तडीपार असले तरी, आणि काय झालं भाजपात सगळे भ्रष्टाचारी, गुंड, बलात्कारी, तडीपार लोक रोज नव्याने येत असले तरी ? अहो उलट आपण या लोकांचे स्वागतच करायला हवे कारण भाजप या लोकांना वाल्याचे वाल्मिक ऋषी बनण्याची संधी देत आहे.. आणि काय म्हटला शिक्षण ? आता मात्र माझे तुमच्याशी भांडण होईल बरे.. अहो सुशिक्षित मंडळींपेक्षा अडाणी चहावाले चांगला देश चालवतात हो.. उद्या एखादा अंडी विकणारा पंतप्रधान झाला तरी मला काही विशेष वाटायचे नाही.. आणि हो गोदी मीडिया.. अहो ते तर पंतप्रधानांच्या देशभक्तीचे गोडवे गात आहेत. त्यांना बोलण्याची हिंमत करता..
अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही.. आणि काय हो मघापासून तुम्ही तुणतुणं वाजवताय की सर्वसामान्य लोकांनी गाड्यांनी प्रवास न करता ट्रेनने, इलेकट्रीकल गाड्यांनी प्रवास करावा मात्र, यांचे मंत्रीसंत्री गाड्यांचा ताफा घेऊन फ़िरतात.. फिरुदेत ते मंत्री आहेत त्यांना सर्व माफ असतं.. खाणं - पिणं -खून- बलात्कार- भ्रष्टाचार.. अहो त्यांच्या समोर उभे राहण्याची आपली लायकी तरी आहे का ?
आणि कोण म्हणतंय तिकडून की, मोदी निलाजरे आहेत.. ? अरे वेड्यांनो राजकारणातील लोक गेंड्याच्या कातडीपेक्षा जास्त निगरगट्ट असतात.. आणि यालाच तर राजकारण म्हणतात.. आणि आतातर मी तुम्हाला शिव्या घालील बरे सतत आपल्या देवाभाऊंची टीका करता त्यांना बटाटा, लाचार, लाळघोट्या म्हणता.. आपल्याला हे अजिबात पटत नाही बाबा.. देवाभाऊंनी महाराष्ट्राला सोन्याचे दिवस दाखविले आहेत. आणि काय म्हणता काँग्रेसने सत्तर वर्षांत काहीच केले नाही ? अहो आरएसएस ने छुपी देशसेवा केली आहे. ब्रिटिशांशी मैत्री करून ते देशसेवा करीत होते.. हा आता त्यांना अतिरेकी संघटना आहे, बंदी घाला असे बोलणारे मूर्ख आहेत.
आरएसएस चे देशसेवेत प्रत्यक्ष भाग न घेताही देशभक्त म्हणवून घेणं हे महान कार्य आहे.. या देशात ज्याकाही सुधारणा झाल्या आहेत त्या केवळ मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासूनच झाल्या आहेत. काँग्रेसने घंटा काहीच केले नाही.. आणि मी म्हणतो काढाना थोडा पोटाला चिमटा होऊद्याना थोडी गैरसोय.. मोदी विष्णूचे अवतार असल्याचे त्यांचे भक्त म्हणत आहेत.. मग देवासाठी एवढं करायला नको काय ? भारत देश, येथील गोरगरीब जनता यांच्यापेक्षा मोदीसाहेब आणि भाजप खूप मोठे आहेत. आणि काय करायचेत हो सुशिक्षित आणि देशाला पुढे घेऊन जाणारे नेते.. हवेत कशाला सुशिक्षित लोक..
हे सुशिक्षित लोक अंधश्रद्धा नको म्हणतात.. कुंभमेळ्यात 25 हजार कोटी रुपये वाया घालविण्यापेक्षा हे पैसे लोकोपयोगी कामांना वापरा म्हणतात, झाडे तोडू नका म्हणतात.. छे छे आपल्याला नेतेपदी सुशिक्षित लोक नकोतच अडाणी लोक बरे.. त्यांना अर्थव्यवस्था चांगली कळते आणि म्हणून ते अदानी आणि अंबानी यांच्या दावणीला आपल्याला बांधीत आहेत.. पुन्हा पुन्हा सांगतो आपण जगात महागुरू आहोत आणि म्हणून अडाण्यांनाच निवडून द्या.. काय समजले ?? अहो हसता काय.. मी खरं तेच बोललो.. आता मोदीजींची आरती उरकून घेतो.. तोवर तुम्ही तुमची कामे उरकून घ्या..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.