देशावर कोसळलेल्या संकटाला दूर करायचे असेल तर कमी खा.. कमी प्या.. बाहेर फिरायला जाऊ नका.. सोने खरेदी करू नका इत्यादी इत्यादी आपल्या शेठ ने आवाहन केले आहे आणि ते आपण ऐकायलाच हवे..
भले आपला शेठ आडेआठ करोडच्या विमानाने नॉर्वेला जाऊदेत नाहीतर दीड लाखाचा चष्मा लावूदेत, नाहीतर लाखो रुपयांचे कपडे घालूदेत. आपण मात्र काटकसर करायची आणि तीही शेठ च्या चुकीने आपल्या अंगाशी आलेली. तरी बरं अजून आपल्याला थाळ्या वाजवायला सांगितलं नाही शेठने.. बरं शेठ नॉर्वेला का गेला तर अदानीचा बिझनेस वाढवायला.. अरे अजून विकाऊ पत्रकारांना हाताशी धरून लोकांना किती फसविणार.. ? लोक सुद्धा मूर्ख आहेत हो गोमूत्र पिऊन आणि गोबर खाऊन देशाची प्रगती होईल असे लोकांना या जमान्यातही वाटत आहे. इतर जग चंद्रावर चालले आहे आणि आपला शेठ आपल्याला पुन्हा डोंगरावर घेऊन चालला आहे. पण अंधभक्त हे मानायलाच तयार नाहीत त्याला कोण काय करणार ? शेठ झुरळाला घाबरला.. फक्त लोकांना खोटी आश्वासने देऊन मूर्ख बनविणे हेच शेठ चे काम आहे. आता मात्र शेठचे दिवस भरले आहेत असे मनापासून वाटते.
भारतीय संविधान आणि लोकशाही अबाधित रहावी असे वाटत असेल तर जातीयता गाडून लोकशाहीला बळकट करणाऱ्या पक्षाच्या हातात आता देश सोपवायला हवा. इथे मी कॉकरोच बद्दल बोलत नाही. कारण कॉकरोच आणि त्यांचे अभिजित दीपके तितकेसे म्हणजे देश संभाळण्या इतके समर्थ वाटतच नाहीत. कॉकरोचला आमचे जाहीर समर्थन जरी असले तरी. कॉकरोच चळवळ दिपके च्या हातात जास्त दिवस राहील असे आम्हाला मुळीच वाटत नाही. कारण दीपके मवाळ स्वभावाचे वाटतात आणि महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्य कॉकरोच नाव अंगीकारून अत्यंत तिखटपणे रस्त्यावर उतरतील व दिपकेची गंमतीने सुरु केलेली ही चळवळ येत्या काळात इतर दुसरा कुणीतरी समर्थ युवा नेता हायजॅक करील यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. अगोदरच बेरोजगारी आणि गरिबीने होरपळलेला तरुण त्यात भाजपच्या थापांना कंटाळलेला तरुण दीपकेचे कायम ऐकेल यावर आमचा शून्य टक्के विश्वास आहे. तूर्तास काय तर भाजपला आणि भाजपने सांगितलेला कमी खा, कमी प्रवास करा इत्यादी इत्यादीचा नारा लोक आता सिरियसली घेत नाहीत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.