रोखठोक बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने अडाणी नेते डोक्यावर बसले आहेत..

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

लोकशाहीला पायदळी तुडवून गल्लीतला नगरसेवक सुद्धा मतदारांशी गद्दारी करीत आहे. पक्षांतर बंदीचा कायदा करावा असे आमच्यासारखे अनेक बोंबलत आहेत पण स्वार्थी राजकारणी मुद्दाम याकडे लक्ष देत नाहीत. मरायला टेकले तरी यांची सत्तेची हाव सुटत नाही. लोकांना अकलेचे डोस पाजणारे नव्वद पंचाण्णव टक्के नेते आणि मंत्री संत्री अत्यंत हीन दर्जाचे आहेत असे म्हटल्यास कुणाच्या ढुंगणाला मिरच्या झोम्बण्याचे कारण नाही.. खरे नालायक आपण आहोत आपण कुठल्याही भिकारचोटाला निवडून देतो.. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि डॉ. श्रीराम लागू आयुष्यभर बोलत राहिले की आता देवाला रिटायर्ड करा.. पण ही गोष्ट आपल्याला पचलीच नाही कारण धर्म आणि देव नावाची भीती गेल्या पाच हजार वर्षांपासून आपल्या मनात स्वतःच्या स्वार्थासाठी काही जातीयवाद्यांनी घातलेली आहे. अरे मानवापेक्षा एलियन्स जास्त पुढारलेले आहेत. आणि आपल्यापेक्षा प्रगत या ब्रह्माण्डात दोन तीन संस्कृत्या आहेत असे शास्रज्ञ बोलत आहेत.

मातीतून आलो आणि मातीत जायचं एवढच सत्य आहे. जगात मानवता हा धर्म आणि स्त्री - पुरुष ही एकच जात या पेक्षा मोठं काहीच नाही. अहो सध्याच्या राजकारण्यांपेक्षा ब्रिटिश चांगले होते असे म्हणण्याची पाळी या लोकांनी आणली आहे. मला सर्वात जास्त राग येतो तो मूग गिळून गप्प बसणाऱ्या लोकांचा. घरात बसून लाखाच्या बाता मारणारे जो वास्तव बोलतोय, लिहितोय त्याच्या मतावर प्रतिक्रिया देण्या एवढे सुद्धा शूर नाहीत.. जग आधुनिकतेकडे आणि विज्ञानवादाकडे झेपावत असतांना आपण मंदिरे बांधतो आहोत आणि काही अत्यंत श्रीमंत बाबा बुवा महापुरुषांचा चुकीचा इतिहास सांगत आहेत. यांना खरेतर चपलेने सडकून काढायला पाहिजे. मंदिरांची सगळी संपत्ती जप्त करून ती लोकोपयोगी कामांसाठी वापरायला हवी. बस करा रे आता देव धर्माचे थोतांड.. या देशाला सुजलाम सुफलाम व्हायचे असेल तर संविधानावर चालणारी लोकशाही हवी आहे आणि लोकशाही बळकट करणारा राजकीय पक्ष.. मला ठाऊक आहे यातील काही  हे वाचूनही पेटून उठणार नाहीत कारण खूपशा लोकांमध्ये स्वाभिमानच उरलेला नाही.. बाकी संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो आणि भ्रष्टाचारी मंत्र्या संत्र्यांचा धिक्कार असो..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

126

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.