बिनविरोध निवडणूक लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारांवर गदा आहे..

हल्ली सर्रास कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी असा राजकीय पक्षांचा कल असतो.. या संदर्भात शब्द खड्ग ने सर्वसामान्य लोकांना या संदर्भात त्यांची मते विचारली..

शब्द खड्ग ने विचारलेल्या जवळपास सर्वच सामान्य मतदारांनी असे सांगितले की, मतदान न घेता एखाद्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. मत देणे हा मतदारांना भारतीय संविधानाने दिलेला अत्यंत महत्वाचा अधिकार आहे. पैसे, दमदाटी आणि इतर अनेक प्रकारची प्रलोभने देऊन जर तुम्ही विरोधी उमेदवाराला विकत घेत असाल अथवा घाबरवत असाल तर ते लोकशाही आणि कायद्याला धरून नाही. या बिनविरोध मुळे  ज्यांची लायकी नाही असे अनेक लोक निवडून दिले जातात जे सर्वसामान्यांना अजिबातच पसंद नसतात. काही लोक असे म्हटले की हे सर्व राजकीय पक्ष आतून एकमेकांशी हातमिळवणी केलेले आहेत. हे लोक कुठलीही पदे आपापसात वाटून घेतात. हे लोक जनतेला मूर्ख समजतात. तर बहुतांश लोकांनी असे सांगितले की बिनविरोध ही पद्धतच कायद्याने रद्द व्हावी व कुठलीही निवडणूक असूदेत ती बॅलेट पेपर वर लढवली जावी. लोकांनी आपापल्या भावना शब्द खड्ग कडे बिनधास्त व्यक्त केल्या असल्या तरी जे लोक देशाचे वाटोळे करायला आणि गुंड तथा पैसेवाल्यांना, व्यापाऱ्यांना सत्तेची खिरापत वाटायला निघालेले आहेत त्यांना सर्वसामान्यांचे काहीही देणेघेणे नाही. आणि म्हणूनच सर्वसामान्यांनी बिनविरोध निवडून दिलेल्या आणि त्यांना मदत केलेल्या अशा सर्वच राजकीय पक्षांना मोडीत काढावे.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

60

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.