लोकशाहीच्या हत्येला जबाबदार कोण..?

लोकशाहीच्या हत्येला जबाबदार कोण ? असा प्रश्न भविष्यात आपल्याला इतर कुणी जरी नाही विचारला तरी आपले मन निश्चितच विचारेल. कारण आपण इतके षंढ आणि थंड झालेले आहोत की आजूबाजूला जे वाईट घडतंय त्यावर स्पष्ट बोलण्याची आपल्यात धमक राहिलेली नाही..

माझ्यामते सर्वात अगोदर लोकशाहीच्या हत्येला मतदार म्हणून आपण तथा  देशाला विज्ञानाकडे नेण्याऐवजी अंधश्रद्धेकडे घेऊन  चाललेले भाजप सरकार.. आणि बहुतांश विकली गेलेली मीडिया जबाबदार आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलने करीत आहे. मात्र, मुख्य मीडिया याला मुद्दाम कव्हरेजच देत नाही. आणि मोदी साहेबांनी संपूर्ण भारताला गेल्या बारा वर्षांत प्रचंड गंडविले आहे हे आपल्याला कळूनही वळत नाही ही शोकांतिका आहे. राहुल गांधींना पप्पू म्हणणारे अंधभक्त मोदी किती शिकलेत ? आणि देश कसा रसातळाला घेऊन चालले आहेत याबद्दल गप्प आहेत. आणि पैशासाठी स्वतःची अस्मिता, तत्वे आणि सर्वच विकणाऱ्या दलबदलू नेत्यांना गद्दार म्हटले तर कुणाला राग येण्याचे  मुळीच कारण नाही. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर इतिहास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र आणि देश सुद्धा कधीच माफ करणार नाही. आज ते सुपात आहेत पण उद्या नक्कीच जनता जागी होईल व यांना जात्यात टाकून दळून टाकतील हे या दोघांनी अजिबात विसरता कामा नये.. आता लोकांनी रस्त्यावर उतरून या देश बुडविणाऱ्या आणि दलबदलू नेत्यांना सळो की पळो करून सोडायला हवे. हे जर सत्ता सोडत नसतील तर ती हिसकावून घ्या कारण यांनी लोकशाहीची निर्घृण हत्या केली आहे. आणि मोठेपणाच्या भूलथापा आणि खोट्या बातम्या देणाऱ्या मीडियाला सुद्धा जन्माची अद्दल घडवायला हवी.. 

- प्रा . दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

219

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.